पिंपळ पार

जुन्या गावचा  पिंपळ पार

                 या परावरचा पिंपळ म्हणजे एखादया पुराण पुरुष्याप्रमाणे ध्यानस्त होता. ज्याने इथल्या मुठभर माणसांची सुख -दुःख अगदी जवळून पाहिली.  होळीचा उत्सव असो, विठोबाच परायण असो, संक्रातिचे खेळ असो वा लग्नाचा मंगल सोहळा असो. कोणाचा भांडण तंटा असो, समोपचाराची बैठक असो वा कोणाची अंत्ययात्रा असो. हा पिंपळ तटस्तपाणे या साऱ्यांचाच एक साक्षीदार होता. कधीपासून होता? माहिती नाही. पण त्याच्याशी काहीतरी जन्म -जन्मांतरीच नातं होतं अस आजही वाटत.  
   बारोमास  हा आश्वथ इथे येणाऱ्या प्रत्येकालाच सावली देत राहीला. पारावर बसणारा प्रत्येकजण म्हणजे या महापुरुषाच्या मांडीवर बसलेला निष्पाप जिव वाटत असे. दिवसाचा हा पिंपळ पार कधी मोकळा नसे. कोणी ना कोणीतरी या पारावार बसलेले दिसयचे , पण चुकून कधी इथे कोणीच नसले तरी हा पार निर्मणुष्य आहे असे कधीच वाटले नाही. कारण त्या पिंपळाच्या हिरव्या पानांची सळसळ नेहमीच जिवंत असे.
माणसांची गरज त्याला कधी पडली नही , उलट माणसालाच त्याची गरज नेहमी पडत असे पण हे तेंव्हा कधी  कोणाच्या लक्षातच आले नाही.
   इथेच मारुतीचे मंदिर होते. आणि तेच समाजमन्दिर ही होते. या मदिराला आमच्या पूर्वज्यानी बनवलेल्या लांबच  लांब जुन्या कोरीव दगडांच्या मजबूत पायऱ्या होत्या. तो पिंपळ पार आणि या पायऱ्या  हे खरंतर गावाच वैभव होत. इथेच पोरांचा लपंडावा , चिंचोके, जिब्ली असे कितीतरी खेळ रंगत होते.  इथेच रंगीत संगीत बाताड़यांचा चौकी कट्टा ही होता. दिवसभराच्या कामाने शिणून आलेला कोणीही इथे येऊन चार शब्द ऐकला -बोलला म्हणजे मनाने हलका व्हायचा.  दिवसभराचा ताण निघून जायचा. संध्याकाळी पिंपळाच्या गार सावलीत शांतता वाटायची. या पराचे , पिंपळाचे त्या मंदिराचे काही अवशेष आजही असतील खरे ......! परन्तु चैत्र -वैशाखात गाळणाऱ्या पिंपळ पानासोबत त्यावेळचे ते जून हिरवे दिवस आणि मन हुरळून टाकणाऱ्या त्या आठवणी कुठल्या कुठे नाहीश्या झाल्या.

आठवणीतल्या या अश्वथाचा मी आजही ऋणी आहे.

विझलेल्या दिव्यानां उजेड शोधत आलो,
तेंव्हा तू अंधारात एकटाच सळसळत होतास. 
माझ्या तना-मानात आजही ती सळसळ भरून आहे.   
तुझ्या हजार हातांची छायाळ माया नसंपणारी होती ,
तरी आजही मी तुझीच सावली शोधत हिंडतोय.    



Thanks for Reading....!
Blogger Widget