Showing posts with label काव्यांजन. Show all posts
Showing posts with label काव्यांजन. Show all posts

कृमी (Korona)


भूतली या श्रेष्ठ मानव, नका वाजवू ढोल.
अस्पष्ट एका कृमीने ही , स्पष्ट केले तुमचे मोल.

धन सम्पत्ती पैसा आणि कळा गोरा डामडौल,
नाती गोती राग लोभ सारेच आहे फ़ोल.

सफ़ेद होऊन पाठीमागे नका करू रे झोल,
तुझे नि माझे काही नसते, विसरुन जा ते बोल.

जीवनाच्या या रंगमंदिरी काय असावा रोल,
जगाता जगाता हरणाऱ्याचा सांभाळावा तोल.

                            ---  एस.व्ही. गोडसे.




Thanks for Reading....!
Please subscribe & Follow my Blog. 
Blogger Widget

प्रिय ऐलिस


(Note: It is devoted for a little Girl- Alice in wonderland)

शोधायचे  न्हवते काहीच  तरी ,
तू गेलीस वास्तवाच्या पलीकडे.
तुझ्या इवल्याश्या मनात होती एक जिज्ञासा म्हणून.

आणि मी !
स्वप्नांच्या हिरव्या वाटा शोधत राहीलो,
ही रोजचीच दुःखं विसरता यावी म्हणुन ,

तुला तर स्वप्नच शोधत आली तुझ्याकडे,
शोधायचे न्हवते काहीच  तरी
तू गेलीस वास्तवाच्या पलीकडे.

पण ऐलिस !
सुखापाठी दुःख असतं , पाठशिवणीचा खेळ
पण एक गोष्ट कळत नाही,
जीवन आणि स्वप्नांचा कुठे लागतो मेळ ?


       
......  एस. व्ही. गोडसे
















Thanks for Reading....!
Blogger Widget

काव्यांजन

   //  प्रस्ताविक  //

  असच एका संध्याकाळी का कोणास ठाऊक  पण व्रतस्त झालेलं आभाळ काहीसं उदास झालं. आणि ध्यानस्त असलेल्या पहाडांच्या सावल्या अंधाराच्या अनामिक ओढीनं सरपटत येऊन माझ्या अवतरणात अलगद विलीन झाल्या.  मग मी माझं सावली नसलेलं अस्तित्व घेऊन हिंडू लागलो. काही वेळाने सांज सरीतून रक्तचिंब झालेलं लाल ओलं केशर झरझऱुण सांडू लागलं , मावळतीच्या गर्भ रेशिम दिशेला संधिप्रकाशची ओढ़ लागलेले पक्षी थव्या - थव्यानी  झेपावले.    आणि अंग हुळहुळनारा वारा मातीच्या उबदार कुशीत जीवघेण्या आनंदाने लोळू लागला.
  स्तब्ध रानात दूरवर एक सळसळ उठली आणि  वात भव-याच्या  मध्यबिंदुतुन उठलेलं रूद्र वावटळ धुळीचे
लोळ च्या लोळ त्या उदास निर्विकार आकाशावर त्वेषाने फेकू लागलं. व  मागू लागलं त्याच्या सवालीच आंदण   मग उशीरन दिशा -दिशा पांघरून घनगर्द काळोख आला. आणि गहिवरलेल्या अंतराळात एका हरवलेल्या एकट
दिवसाची धीरगंभीर विराणी घुमू लागली. तिच्या फाटक्या जड सुरांनी गजबजलेलं मन सैरभैर होऊन गर्द काळोखाचा अथांग डोह पिंजत राहिलं. किती तरी वेळ - किती तरी वेळ निघून गेला. आणि मग एका अदभूत कासायावेळी दिगंताच्या सुदूर वाटेवरून प्रकाश्याचे दूत त्या शब्दांची पालखी अनाहूतपणे घेऊन आले. तिच ही काव्यधारा म्हणजे सरस्वतीने दिलेली एक सुगंधीत फुलांची ओंजळ. तशी ती अजून अल्लड आहे. पण म्हणून मी काही तिच्यासाठी -हृदयाच्या पायघडया अंथरलेल्या नाहीत. कारण तिला देखिल या मातीची ओढ अगाध आहे. 

Blogger Widget