भूतली या श्रेष्ठ मानव, नका वाजवू ढोल.
अस्पष्ट एका कृमीने ही , स्पष्ट केले तुमचे मोल.
धन सम्पत्ती पैसा आणि कळा गोरा डामडौल,
नाती गोती राग लोभ सारेच आहे फ़ोल.
सफ़ेद होऊन पाठीमागे नका करू रे झोल,
तुझे नि माझे काही नसते, विसरुन जा ते बोल.
जीवनाच्या या रंगमंदिरी काय असावा रोल,
जगाता जगाता हरणाऱ्याचा सांभाळावा तोल.
--- एस.व्ही. गोडसे.
Thanks for Reading....!
Please subscribe & Follow my Blog.
No comments:
Post a Comment
Thanks