काव्यांजन

   //  प्रस्ताविक  //

  असच एका संध्याकाळी का कोणास ठाऊक  पण व्रतस्त झालेलं आभाळ काहीसं उदास झालं. आणि ध्यानस्त असलेल्या पहाडांच्या सावल्या अंधाराच्या अनामिक ओढीनं सरपटत येऊन माझ्या अवतरणात अलगद विलीन झाल्या.  मग मी माझं सावली नसलेलं अस्तित्व घेऊन हिंडू लागलो. काही वेळाने सांज सरीतून रक्तचिंब झालेलं लाल ओलं केशर झरझऱुण सांडू लागलं , मावळतीच्या गर्भ रेशिम दिशेला संधिप्रकाशची ओढ़ लागलेले पक्षी थव्या - थव्यानी  झेपावले.    आणि अंग हुळहुळनारा वारा मातीच्या उबदार कुशीत जीवघेण्या आनंदाने लोळू लागला.
  स्तब्ध रानात दूरवर एक सळसळ उठली आणि  वात भव-याच्या  मध्यबिंदुतुन उठलेलं रूद्र वावटळ धुळीचे
लोळ च्या लोळ त्या उदास निर्विकार आकाशावर त्वेषाने फेकू लागलं. व  मागू लागलं त्याच्या सवालीच आंदण   मग उशीरन दिशा -दिशा पांघरून घनगर्द काळोख आला. आणि गहिवरलेल्या अंतराळात एका हरवलेल्या एकट
दिवसाची धीरगंभीर विराणी घुमू लागली. तिच्या फाटक्या जड सुरांनी गजबजलेलं मन सैरभैर होऊन गर्द काळोखाचा अथांग डोह पिंजत राहिलं. किती तरी वेळ - किती तरी वेळ निघून गेला. आणि मग एका अदभूत कासायावेळी दिगंताच्या सुदूर वाटेवरून प्रकाश्याचे दूत त्या शब्दांची पालखी अनाहूतपणे घेऊन आले. तिच ही काव्यधारा म्हणजे सरस्वतीने दिलेली एक सुगंधीत फुलांची ओंजळ. तशी ती अजून अल्लड आहे. पण म्हणून मी काही तिच्यासाठी -हृदयाच्या पायघडया अंथरलेल्या नाहीत. कारण तिला देखिल या मातीची ओढ अगाध आहे. 

Blogger Widget

No comments:

Post a Comment

Thanks