The Revenant

     'अलेजांद्रो इनारितू' हा एक मॅक्सिकन दिग्दर्शक , प्रोडूसर आणि पटकथा लेखक आहे. याचा जन्म ऑगस्ट १९६३ साली मेक्सिको शहरात झाला. त्याच्या किशोर वयात त्याने यूरोप -अफ्रीका या दरम्यान अटलान्टिक महासागरावरून चलणाऱ्या व्यापारी मालवाहु जहाजावर काही काळ नोकरी केली.  नंतर १९८४ मध्ये  त्याने मैक्सिको रेडिओ स्टेशनला एक रेडीओ होस्ट म्हणून आपल्या करिअरला सुरवात केली. इथूनच त्याच कथालेखन चालु झाल. नंतर त्याने स्वताच एक छोटी 'झेड फिल्म्स ' नावाची प्रोडक्शन कंपनी चालू केली आणि  काही शॉर्ट फिल्म्स बनवायला सुरुवात केली.  सन २००० साली त्याचा 'अमोरेस पेरोस ' हा  मेक्सिकन समाज जीवनावर आधारीत पहिला सिनेमा प्रदर्शित झाला. ज्याला कान फिल्म फेस्टिवल मध्ये सिटीज़ वीक ग्रँड प्राइस मिळाले. आणि best foreign language  म्हणून Academy Award ही जाहीर झालं. या यशा नंतर त्याने '२१ ग्राम्स (२००३)', 'बेबल (२००६)', ब्यूटीफुल (२०१०), बार्ड मैन (२०१४), आणि 'दि रेवेनंट (२०१५)' आशा कही दर्जेदार चित्रपटांची निर्मिति केली.

       त्या पैकी  'दि रेवेनंट' या चित्रपटाला एकूण १२ नामांकने मिळाली. बेस्ट पिक्चर , बेस्ट डिरेक्टर , बेस्ट एेक्टर , बेस्ट सिनेमाटोग्राफी , आणि बेस्ट विजुअलायझेशन सह २०१५ सालचा हा सर्वोत्कृष्ट ऑस्कर सिनेमा ठरला.

    'दी रेवेनंट' हा सिनेमा एका अमेरिकन लेखक 'माइकल फूंके' याच्या त्याच नावाने २००२ साली प्रकाशित झालेल्या एका प्रसिध्द कदंबरीवर आधारित आहे. ही कादंबरी सन सतराशे  ते आठराशेच्या काळात नॉर्थ अमेरिकेच्या जंगलात  घडलेल्या एका सत्य घटनेवार आधारित आहे. 'ह्यु ग्लास' नावाचा एक शिपाही त्यावेळच्या घनदाट जंगलातून प्राण्यांची शिकार करुन त्यांच्या दात आणि कातडीचा व्यापार करत असे. तो हा 'ह्यु ग्लास' व त्याचे काही साथीदार यांच्या जीवनात घडलेला थरार ही कादंबरी विस्तारणे सांगते. परंतु या कदंबरीच्या ही फार पूर्वी म्हणजे १९७१ मध्ये 'ह्यु ग्लास' च्या या जंगलातील आयुष्यावर एक चित्रपट निघाला होता तो म्हणजे 'मँन इन दि वाइल्डरनेस' त्याचे दिग्दर्शन 'रिचार्ड सराफेन' या दिग्दर्शकाने केले होते.

      दिग्दर्शक इनारितुची चित्रपट सदारीकरणाची शैली खुप वेगळी आहे. त्याचा चित्रपट सुरु होण्याधीच अंधरलेल्या पार्श्वभूमीवरून पुढे घडणाऱ्या एका थरार नाट्याचा एक वेगळाच आवाज एकू येऊ लागतो.  व तो हळूहळू वाढत जाऊन क्षणार्धात प्रेक्षकांचे लक्ष्य वेधून घेतो. 'दि रेवेनंटची ' सुरुवात ही अशीच आहे. पडद्यावर काही दिसण्याधीच रानातून श्वास घेत घोंगावना-या वाऱ्याचा भयावह आवाज एकु येऊ लगतो. आणि हळुहळू एक जळून उध्वस्त झालेली राहुटी व त्यात यातना व्याकुळ झालेलं कुटुंब दिसतं. हे एक कधीकळी उध्वस्त झालेल्या नायकाच्या आयुष्याचं दिवास्वप्न असतं. त्यानंतर दिसतं ते जंगलातील आभाळाला भिडणाऱ्या ऊंच झाडांच्या मधून संथ गतीने वहानारे पाणी व नंतर त्या पाण्यातून सावकाश पाय ओढत चाललेला बंदूकधारी शिकारी 'ग्लास ' व त्याचा साथीदार. पुढे येणाऱ्या सावजाला पाण्याचा आवाजाही जाणार नाही आशा बेताने दोघेही पुढे होऊन 'ग्लास' एका सावजावर आपला निशाना साधतो, एक भलं मोठं जनावर निर्जीव होऊन पडतं. मग त्या जंगलात आलेले ग्लासाचे सगळे साथीदार शिकार झालेल्या सगळ्या जनवारांची कातडी सोडवताना दिसतात. वाढलेले केस आणि दाढ़ी, सा-यांचेच ओरभाडलेले चहरे , कोणी सामनाची व्यावस्था लावतो आहे. कोणी एक मेकाशी वादविवाद घालतो आहे. आणि एवढ्यात आरिकारा या रानटी लोकांचा हल्ला होतो. (अरिकारा ही एक अमेरिकन आदिवासी जमात होती. )   आणि मग सुरु होतो रानटी आक्रमणाचा एक संवेदनहीन खेळ.

जिवन मृत्युशी संघर्ष करणाऱ्या
लढवय्याची कहानी
प्रत्येकानेच पहायला हवी.

कला आस्वाद भाग -२ 

..... क्रमश:


   
Blogger Widget

No comments:

Post a Comment

Thanks