मलंग

      काल मलंग पाहीला. आणि नेहमीप्रमाणेच 'सिनेमा हा एक समाजाचा आरसा आहे' ही  संकल्पनाच अलीकडे पुसली जाऊन भारतीय हिंदी सिनेमा हा हॉलिवूडची नकल करत कोणत्या तरी अवस्तावाच्या दिशेने जात असल्याचा पुन्ह: प्रत्यय आला.
 
        आजच्या हाय प्रोफाईल तरुण पिढीला जोजवणारे रेव्ह पार्टीतल ड्रग्ज माफिया आणि एकीकडे स्वतः नामर्द असल्याच्या विवंचनेत असलेला एक तरुण एवढ्याच एका पोचट बेस पॉइंटवरती आख्खा चित्रपट आधारलेला आहे. मग त्यामध्ये  विनाकारण  प्रेक्षकाला आकर्षित करण्यासाठी रेव्ह पार्ट्या,न्युडीटी,ॲक्शन आणि हिंसा या गोष्टी आज पेव फुटलेल्या वेब सिरीज प्रमाणे ओघाने येतातच. 
       आता चित्रपटाचा आशय आणि विषय बाजुला ठेवुन पहायचे म्हाटले तर, अदित्य रोय, अनिल कपुर यांचा अभिनय
प्रशंसनिय आहे, तसेच सिनेमाटोग्राफी व एडिटिंग पाहण्यासारख उत्कृष्ठ आहे. सिनेमाचं टेक्निकल नॉलेज असलेल्यांना ते नक्की जाणवेल.

 एकुणच मलंग म्हणजे एक निक्रुष्ट आशय आणि उत्कृष्ठ मांडणी अस काहीसं झालं आहे.
                                          

                                                                                                                   ....... ......  एस. व्ही. गोडसे.
Blogger Widget