पुढारी




सफ़ेद पोषाख घालुन,
सरकारी गाडीतन फ़िरायचं
दुनिया सलाम करते तेव्हा,
मोकळेच हात हलवुन,
उगा आपलं आश्वासन द्यायचं

आपल्याला कुठे काय येतं
चार ईयत्ता शिकलेली असतात,
त्यांनाच गोड बोलुन घ्यायचं 
सारं काम त्यांनाच लावायचं.
 
 भत्ता आपला चालुच असतो,
पार्ट्या करुन मस्त रहायचं,
पण भाषण देताना मात्र,
गरीबीचं पाढं वाचायला शिकायचं.

काम करायचं काहीच नसतं
पण स्टंटमधुन ते दाखवायचं असतं
कधीमधी मोर्चे काढयचे,आंदोलन करायचं.
महिनाभर गाजावाजा करण्यास
मिडियावाले असतातच.

जे 70 वर्षात बदललं नाही
ते आपल्या घाडीभर प्रवासात
काय बदलनार? ढेकळं.....?
 







------ S.V.Godase Blogger Widget

पाऊस



दरवर्षी पाऊस येतो
ओढे नाले भरून 
नदीला ही पुर येतो....

शासनासारखाच-
भोंगळ कारभार
पाऊसाचाही असतो.

लहर येईल तसा येतो
नि कहर करुन जातो
शेती वाडी वाहून जाते
घरात ही पुर येतो.....

दरवर्षी पाऊस येतो,
वादळवारा सोसाट्याचा
सारं काही फ़ुंकुन जातो

झाड होऊन मुक्यानेच
पहाण्याशिवाय वाव नसतो
बुडता बुडता स्वतःलाही
सावरण्याचा ठाव नसतो


पुरामधल्या पाण्यातुनच
सरकाराची बोट येते
नि घरावरुन तरंगत
उघड्यावरचा प्रावास होतो.

मग कधी मंत्री येतो,
आकाश्याच्या विमानातुन
काचेसारख्या डोळ्यांनी,
सारे काही पाहुन जातो...

दरवर्षी पाऊस येतो,
वाहुन जातात गुरंढोरं
नि कोसळलेली घरं
मदतीची वाट पाहत
डोळ्यामंधी पुर येतो.



------ S.V.Godase
Blogger Widget

Spirit of Life-2 Thoughts are Miracle.


Thoughts are Miracle. It is the power of our mind.

आपले आयुष्य हे आपल्या विचारांवर घडत असते. आपले विचार ही आपल्या मनाची शक्ती आसते.
आणि हेच विचार आपल्या रोजच्या जगण्यावर कसे जादुप्रमाणे प्रभावशाली ठरत असतात त्याचे हे
उदाहरण.

 एका शेहरामध्ये एक सर्व सामान्य लेडी रहात असते। ती दिसयला फारशी सुंदर नसते पण फ़ारशी कुरुपही नसते.
फारशी उंचही नसते किंवा फारशी ठेंगु ही नसते. अगदी सर्व सामान्य। परंतु तिला नेहमीच वाटत असते की आपण सुंदर का नाही आहोत। आपल आयुष्य चार्म्फ़ुल्ल सुंदर असं का नाहीये? हा विचार करत असता- ती एक दिवस बाहेर शॉपिंगला जाते। आणि एका शॉपमधे तिला एक Hat आवडते। ती Hat घालुन ती अरशासमोर ऊभी रहाते तेंव्हा ती तिला स्वतालाच खुप सुंदर दिसु लागते, ति Hat तिला खुपच आवडते, ती ति विकत घेण्यासाठी कौंटरला जाते, उत्साहाने पैसे देऊन बाहेर पडते. पुढे वाटेत तिला एक कॉपी शॉप लागते, आनंदाने ती कॉपी पिण्यासाठी तिकडे जाते,
कॉपी शॉपचा मालक तिचे गोड हसुन स्वागत करतो. ती कॉपी प्यायला बसते तेव्हा आजुबाजुचे लोकही तिच्याकडे आदराने पहाताना तिला दिसतात. तिच्या चेहर्यावर पुन्हा स्मितहास्य खुलते.
 नंतर कॉपी पिऊन ती पुढे आपल्या मैत्रीनींकडे जाते. तिच्या सार्या मैत्रीनी तिचे हसुन स्वागत करतात व उत्साहने बोलतात. खुप गप्पा झाल्यावर शेवटी ती लेडी घरी येते आणि तितक्याच उल्हासीत मनाने ती आपले सामान बाजुला ठेऊन आरशासमोर ऊभी रहाते. दिवस खुप सुंदर गेल्याने तिच्या चेहर्यावर पुन्हा आनंद आणि हास्य उमठते, परंतु
ईतक्यात तिच्या लक्षात येते की तिने घेतलेली ती सुंदर Hat तिच्या डोक्यावर नाही। ती विचार करु लागते- कुठे गेली Hat? मग तिला एकदम आठवते की ज्या दुकानात तीने Hat घेतली तिथे पैसे देताना उत्साहाच्या भारात ती त्या कौंटरवरच विसरली होती.

मित्रांनो जसे तुमचे विचार असतात तसेच तुमचे जीवन घडत असते. 


Think positive be positive.





------ S.V.Godase Blogger Widget

Spirit of Life


    प्रत्यकजण आपले आयुष्य सुखकर होण्यासाठी दिवस-रात्र धावपळ करत असतो. परंतु हे करताना आपण विसरलेलो असतो कि सुख.. किंव्हा आनंद हा आपल्या मनाच्या समजुतीवर अवलंबुन असतो. ज्या मनात आपेक्षा जास्त तिथे त्या परिपुर्ण न होण्याच दु:खच कायम राहतं, म्हणुनच गौतम बुद्धांनी मानवी आयुष्यातील दु:खाच करण एकाच वाक्यात लिहुन ठेवले आहे. ते म्हणजे-

"Hope is the root cause of unhappiness."

      आशा आणि अपेक्षा हेच खर दु:खाच मुळ करण आहे. परंतु आता आयुष्यात काहीच आपेक्षा ठेवु नये का...?

  तर असं काहिच नाही. आशा आणि अपेक्षांनी भरलेली स्वप्न पाहुन ती सत्यात आनण्यासाठी धडपड करणं हेच तर खरं आयुष्य आहे. परंतु हे करत असताना नेहमीच फलप्राप्तीची किंवा यशाची अपेक्षा ठेवु नये, तुम्ही केलेले प्रयत्न जर तुमच्या मनापासुन निर्भेळ असतील तर यश अपोआप तुमच्याकडे येते. पण यदाकदाचित  हिच केलेली धडपड कधी-कधी निषफळ ठरते आणि आपण हताश होतो, प्रयत्नाची पराकाष्टा करणारे आपण आणि आपले मनही खचुन जाते. तेंव्हा करायचं काय?  स्वताला सावरुन नव्याने ऊभे रहाणे तर गरजेचे असते. त्यासाठी इथे एक अमेरिकन लेखक 'जोन डेरिअन' याची कविता आठवते. हि कविता आपल्या मनाला खुप मोठ धैर्य आणि हिम्मत देते.


To dream the impossible dream,
to fight the unbeatable foe,
to bear with unbearable sorrow,
and to run where
the brave dare not go


स्वप्न पहायच असेल तर असं स्वप्न पहा कि जे आजपर्यंत कोणी कधीही सत्यात उतरवु शकले नाही, 

लढायच असेल तर अशा शत्रुशी लढा कि ज्याला कोणी आजपर्यंत हरवु शकले नाही. 

सहन करायचं असेल तर असं दु:ख सहन कराण्याची क्षमता स्वत:मधे निर्माण करा कि जे कोणाच्याही सहनशक्तीच्या पलिकडे असह्य आहे.

आणि आयुष्यात अशा ठिकाणी धाव घ्या कि जिथे शुरविर देखिल जायला घाबरतात.


to right the unrightable wrong,
and to love pure and chaste from afar,
to try when your arms are too weary,
to reach the unreachable star:
this is my quest.

आयुष्यात अशा चुका सुधारा कि ज्या कधीच कोणी सुधारु शकले नाही.

आणि एकमेकावर असं प्रेम करा कि जे तुमच्या अंतकरणापसुन शुद्ध , निर्भेळ आणि वासनाहिन असेल.

आयुष्यात काही प्रयत्न करायचे असतील तर खरे प्रयत्नांना तेव्हाच सुरवात करा जेव्हा तुमचे हात थकलेले असतील.

आणि अशा एका ऊंचीवर पोहचा कि जिथे अवकाशाचा शुभ्र तारा देखिल पोहचू शकत नाही. this my Quest.

हा माझा दिर्घकाळाचा शोध सुरु आहे. 

To follow that star
no matter how hopeless,
no matter how far,
to fight for the right
without question or pause,


त्या उज्वल भविष्याकडे जाण्यासाठी सज्ज व्हा

ते किती दुर आहे किंवा निरर्थक आहे याचा काहीच संबध नाही

मनात काहीही शंका न ठेवता न दमता, जे योग्य वाटते त्यासाठीच लढा .


to be willing to march, 
march into hell
for that heavenly cause

त्या सफ़लतेकडे जाण्यासाठी ईर्शेने तयार व्हा,

मग भले तुम्ही नरकात गेला तरी तुमच्या जाण्याने तिथे स्वर्गच बनेल. 

शेवटी कवी म्हणतो....!

And I know

if I’ll only be true
to this glorious quest
that my heart
will lie peaceful and calm
when I’m laid to my rest
and the world will be
better for this
:


आणि मला पुर्ण खात्री आहे.

कि जर त्या वैभवशाली शोधासाठी, माझे प्र्यत्न खरे असतील

तर मी माझ्या निश्चीत ठिकाणी गेल्यावर 

माझे ह्रुदय देखिल निर्मम, शांत आणि संतुष्ट असेल.



And the world would be better for this
That one man scorned and covered with scars
Still strove with his last ounce of courage
To reach the unreachable
The unreachable
The unreachable
Star


 आणि ते जगही त्या माणसासाठी तितकेच सुंदर असेल.

जो माणुस अनेक यातना आणि तिरस्काराच्या डागांनी झाकुन गेलेला आहे.

पण तरिही त्या अश्यक्य अशा ठिकानी पोहचण्यासाठी, 

त्याची धडपड हि शेवटच्या धाडसासाठी चालुच असेल.

 ***



-- Lyrics by Joe Darion
music by Mitch Leigh

“Mad men are children of God.”
Dale Wasserman




Blogger Widget