नमस्कार मित्रांनो , आस्वाद ही एक मराठी वाचक ,साहित्य,संगीत आणि चित्रपट प्रेमींसाठी नवी लेखनमालिकाआहे, सर्वांनाच ही नक्की आवडेल अशी अपेक्षा करतो. त्याचबरोबर फ्री बुक्स मध्ये विनामूल्य पुस्तके व फ्री इमेजेस मध्ये तुमच्या भाषेतील शुभेछ्या व आभार देण्यासाठी अनेक कार्ड्स ही येथे उपलब्ध आहेत. त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता व आपल्या मित्रांना ही शेर करू शकता. हा ब्लॉग आवडल्यस आपल्या ईमेल आयडी सह नक्की सब्सक्रइब करा त्यामुळे ब्लॉगवर अपडेट होणारे नव नविन लेखन तुम्हाला माहीत होईल.
[सूचना : या डिजिटल मराठी लेखना मध्ये चुकून काही किरकोळ चूका आढळल्यास आम्ही आपले सदैव क्षमस्व राहीन . ]
लहान असताना तुम्ही कधी गर्द गाभुळलेलि चिंच खाल्लेय काय? आता या प्रश्नावर काहींच्या प्रतिक्रया असतील : काय बालिश प्रश्न विच्यारतो हा ! तसही आहे खरं. पण खाल्ली असेल तर आठवून पहा. ती चिंच तोंडात टाकण्या आधीच तोंडाला सुटणारं पाणी आणि खाल्यावर आम्बट गोड चवीने शिवशिवनारे दात. या नंतर काही दातांच्या दुखण्याने खाने टाळतात परंतू काहीजण त्याचीही फिकिर न करता खात राहतात. कारण त्यांना खाण्याचा तो अतिवा आनंद, आस्वाद हवाच असतो.
एक जापानी दिग्दर्शक आहे 'अकिरा कुरोसावा' याने 'राशोमोन ', 'सेवन सामुराई ', 'दर्सू उजाला ' यासारखे काही जगप्रसिद्ध चित्रपट बनवले. तो म्हणतो 'I like Extrim'. आता Extrim म्हणजे नेमके काय आणि किती ?
तर पाऊस असेल तर तो मुसळधार असावा , वादळ असेल तर ते भवन्डर असे धुळीचे लोळ उठवणारे असावे.
आग म्हणजे वणवा आणि पाणी म्हणजे समुद्राच्या बेफाम लाटा असाव्यात.
कोणत्याही गोष्टीचा आस्वाद घेताना मलाही तसच वाटतं. त्या गोष्टीच्या अगदी खोल तळाशी जावं , आणि आपल्या जिद्न्यासु मनाने त्याची सम्पूर्ण तीव्रता जाणून घ्यावी. म्हणजे पिकलेला आंबा किंव्हा ऊस खायचा असेल तर त्याचे सर्व सार गोड रसासहित शोषून घ्यावे. वाचताना प्रत्येक शब्द हातात घेऊन त्याच्या भव्य सौंदर्यानिशी निरखूं पाहवा. एखादं आवडतं गाणं असेल तर त्याच्या शब्द -सुरांच्या प्रवाहात वहावत जावं , त्याच्या वेगवेगळ्या अर्थांच्या पैलूंचा रंगीत प्रकाश सम्पूर्ण आपल्या अंगभर पसरावा. आणि मग पिकासोच्या चित्रातल्या त्या 'Colorfull Man' सारखं रंगीत व्हावं. किंव्हा जीएंच्या कथेतील एखाद्या पात्रासारखं बेधुंद होऊन जगावं. त्या रंगीत प्रकाश्याच्या समुद्राला भारती यावी आणि बेफाम उसळणाऱ्या लाटांची पर्वा न करता केवळ आस्वादाच्या ओढीने चालत रहावं. खुप चालत रहावं अगदी स्वप्नांच्या पलीकडे.
✎.... एस. व्ही गोडसे.
खूप छान ..कोणत्याही गोष्टीचा आस्वाद घेताना त्या गोष्टीच्या अगदी खोल तळाशी जावं...अगदी खोलवर ....खूप खोलपर्यंत ....
ReplyDeleteप्रेरणा देणारे लेखन