आज कालच्या नव्या पिढीला जुने चित्रपट - जुनी गाणी फारशी माहीत नसतात.किंवा माहिती असली तरी त्यामध्ये
फ़ारसे स्वरस्या दिसत नाही. रिमीक्स, डि.जे. च्या ग्ल्यॉमर दुनियेत सारेजन गुरफटुन जात आहेत. परन्तु अनेक जुने भारतीय चित्रपट याच ग्ल्यॉमर दुनियेला आज देखिल पुन्हा आठवल्या शिवाय रहात नाहीत. कारण ते आहेत काळाच्या पडद्यावर कोरुन ठेवलेले अप्रतिम साज.....
असच एकदा "दो आखें बारह हाथ" हा- ग.दी. माडगुळकर लिखित व्ही. शान्ताराम यांचा चित्रपट पहात होतो. कुठेतरी वाचल होत चांगला आहे म्हणुन. पण डोळ्यांना रंगीत ग्ल्यॉमरची सवय, आणि ब्लॅकेन- व्हाइट पहाताना ते सुरुवतिलच थकले. एक ऑफिसर(व्हि.शान्ताराम) सहा कैद्यांना पुर्ववत माणसात आणुन सुधारना करन्याची हमी घेतो, व त्यांना घेउन एका ओसाड, माळरानी शेती कसन्याच्या उध्देशाने येतो. हे पहाताना खुपच बोरिंग अस् वाटलं, आता पुढे काय असेल फार तर पळुन जाण्यासाठी कैद्यांनी केलेली धडपड, मारामारी इतकेच. परन्तु शेतीची मशागत करुन दमलेले कैदी परत घरी येतात, आणि अचानक एका गायिकेच्या गाण्याचा गोड स्वर कानावर येतो.....
ओs ओss ओsओओ SSssssssss
सैय्या झूटॉ का बडा सरताज निकला..
हाय हाय... वसन्त देसाई यांचे संगीत,भरत व्यासांचे शब्द आणि लताचा सूरेल आवज.क्षणार्धात सारा थकवा कुठल्या कूठे निघुन जातो. आणि आपण आळस देत पडलो असताना उठून बसतो. संध्या या अभिनेत्रिचं सुरांच्या ठेक्यवर अंग हिन्द्कळत चालनं, आणि चालता-चालता मागे अडकवलेल्या कात्यान्च्या छडीचा आवाज. हे गाणं आपण मन्त्रमुग्ध होऊन ऎकत रहतो.. पहत रहातो.
कंटाळा आला असतानाच एका नव्या कॅरेक्टर(चम्पा) ची एन्ट्री होते व पुढचे एपीसोड पहाण्याची ओढ लावणारा नवा खेळ सूरु होतो. हि चम्पा नेहमीच येता -जाता हे गाणं म्हणत असते,
सैय्या झूठों का बडा सरताज निकला
मुझे छोड चला, मुख मोड चला.....!
नंतर राहुन राहुन असं वाटत की खरंच या बिच्यार्या चम्पाला तिचा जिवनसाथी सोडुन गेला असेल का?
आणि का बरं गेला असेल? आपल्या जिवलग प्रेयसीला असं एकाकी सोडून जाणं म्हणजे किती यातनमय आहे,
हे त्याला का कळू नये का? इत्यादी.
परंतू वसंत देसाई यांचे संगीत मात्र ऎकणार्याच्या काणाला भुरळ पाडते. ते अधिक-अधिक ऎकावेसे वाटत
रहाते. ग. दी. माड्गुळकराचा हा हिंदीतील पहीलाच सिनेमा त्यांनी आपल्या लेखणीने सहज यशस्वी केला आहे.
No comments:
Post a Comment
Thanks