'Class of 83'



  'Class of 83' 
     
 जुनी मुंबई आणि इथे घडून गेलेल्या गुन्हेगारी जगताच एक अफ़लातुन आणि वास्तववादी नाट्य पहाताना  जाणवले कि आता Bollywood हे Entertainment च्या विळख्यातुन बाहेर पडते आहे, आणी पुन्हा वास्तवदर्शी कहीतरी आकार घेते आहे. तसे पाहीले तर 20 व्या शतका नंतरच Bollywood ने आपले रुप पालटले, देवदास, लगान, स्वदेश, गैंग्स ओफ़ वसेपुर, दंगल, आर्टिकल 15, मसान, अ वेन्सडे, अश्या अनेक चांगल्या चित्रपटांची निर्मिती झाली आणि अनेक नवोदीत दिग्दर्शकही तयार झाले.
 
   'Class of 83'  हा क्रिईम जर्न्यालिस्ट व लेखक 'हुसेन झाईदी' यांच्या त्याच नावाने असलेल्या वास्तववादी कादंबरीवर आधारीत आहे, व याचे दिग्दर्शन 'अतुल सभरवाल' या नवोदीत पण गुणी दिग्दर्शकाने अत्यंत चागल्या पध्दतीने केले आहे. विषयाची मांडनी, सिनेमाटोग्राफी, सिन-सिक्वेन्स, एडीटींग, कलर ग्रेडींग सर्वच गोष्टी अंत्यंत लक्षपुर्वक हताळलेल्या आहेत. त्याचबरोबर 'बॉबी देओल' या मुरलेल्या अभिनेत्यासह सर्वच नव्या-जुन्या कलाकारांचा अभिनय देखिल वाखानण्याजोगा आहे.
 

 

 हि स्टोरी आहे 1980 सालची. जेव्हा मुंबईमध्ये गुन्हेगारी जगताचं जाळ पसरलं होतं, आणि ते तोडण्यासाठी पोलिसांची नामुश्की झाली होती. करण पॉलिटीक्स मधील अनेक बडे राजकारणी देखिल यामधे जोडले गेलेले होते.
याची सुरुवात होते ती नाशिकमधील पोलिस ट्रेनिंग सेंटरमधुन, पोलिस भरती झालेले काही नवोदीत तरुण आपल्या डिनच्या प्लानिंग प्रमाणे एक ग्रुप तयार करुन हे गुन्हेगारीच जाळं तोडण्यात यशस्वी होतात। त्याची त्यांना जाणिवपुर्वक किंमतही मोजावी लागते. परंतु एकुनच क्षणा-क्षणाला हे उत्कंठा वाढवनारं नाट्य पहाताना
मनाला भिडनार्या वास्तवाचा एक अस्सल अनुभव देउन जाते.
 
शहारुख खानच्या "Red Chilly Entertainment' द्वारे तयार झालेला हा सिनेमा 'Netflix' वरती प्रदर्शित झाला आहे.  सिनेमाची आवड असनार्या प्रत्यकाने हा नक्की पहावा.
 
   





------ S.V.Godase Blogger Widget

No comments:

Post a Comment

Thanks