पुढारी




सफ़ेद पोषाख घालुन,
सरकारी गाडीतन फ़िरायचं
दुनिया सलाम करते तेव्हा,
मोकळेच हात हलवुन,
उगा आपलं आश्वासन द्यायचं

आपल्याला कुठे काय येतं
चार ईयत्ता शिकलेली असतात,
त्यांनाच गोड बोलुन घ्यायचं 
सारं काम त्यांनाच लावायचं.
 
 भत्ता आपला चालुच असतो,
पार्ट्या करुन मस्त रहायचं,
पण भाषण देताना मात्र,
गरीबीचं पाढं वाचायला शिकायचं.

काम करायचं काहीच नसतं
पण स्टंटमधुन ते दाखवायचं असतं
कधीमधी मोर्चे काढयचे,आंदोलन करायचं.
महिनाभर गाजावाजा करण्यास
मिडियावाले असतातच.

जे 70 वर्षात बदललं नाही
ते आपल्या घाडीभर प्रवासात
काय बदलनार? ढेकळं.....?
 







------ S.V.Godase Blogger Widget

पाऊस



दरवर्षी पाऊस येतो
ओढे नाले भरून 
नदीला ही पुर येतो....

शासनासारखाच-
भोंगळ कारभार
पाऊसाचाही असतो.

लहर येईल तसा येतो
नि कहर करुन जातो
शेती वाडी वाहून जाते
घरात ही पुर येतो.....

दरवर्षी पाऊस येतो,
वादळवारा सोसाट्याचा
सारं काही फ़ुंकुन जातो

झाड होऊन मुक्यानेच
पहाण्याशिवाय वाव नसतो
बुडता बुडता स्वतःलाही
सावरण्याचा ठाव नसतो


पुरामधल्या पाण्यातुनच
सरकाराची बोट येते
नि घरावरुन तरंगत
उघड्यावरचा प्रावास होतो.

मग कधी मंत्री येतो,
आकाश्याच्या विमानातुन
काचेसारख्या डोळ्यांनी,
सारे काही पाहुन जातो...

दरवर्षी पाऊस येतो,
वाहुन जातात गुरंढोरं
नि कोसळलेली घरं
मदतीची वाट पाहत
डोळ्यामंधी पुर येतो.



------ S.V.Godase
Blogger Widget