पिंपळ पार

जुन्या गावचा  पिंपळ पार

                 या परावरचा पिंपळ म्हणजे एखादया पुराण पुरुष्याप्रमाणे ध्यानस्त होता. ज्याने इथल्या मुठभर माणसांची सुख -दुःख अगदी जवळून पाहिली.  होळीचा उत्सव असो, विठोबाच परायण असो, संक्रातिचे खेळ असो वा लग्नाचा मंगल सोहळा असो. कोणाचा भांडण तंटा असो, समोपचाराची बैठक असो वा कोणाची अंत्ययात्रा असो. हा पिंपळ तटस्तपाणे या साऱ्यांचाच एक साक्षीदार होता. कधीपासून होता? माहिती नाही. पण त्याच्याशी काहीतरी जन्म -जन्मांतरीच नातं होतं अस आजही वाटत.  
   बारोमास  हा आश्वथ इथे येणाऱ्या प्रत्येकालाच सावली देत राहीला. पारावर बसणारा प्रत्येकजण म्हणजे या महापुरुषाच्या मांडीवर बसलेला निष्पाप जिव वाटत असे. दिवसाचा हा पिंपळ पार कधी मोकळा नसे. कोणी ना कोणीतरी या पारावार बसलेले दिसयचे , पण चुकून कधी इथे कोणीच नसले तरी हा पार निर्मणुष्य आहे असे कधीच वाटले नाही. कारण त्या पिंपळाच्या हिरव्या पानांची सळसळ नेहमीच जिवंत असे.
माणसांची गरज त्याला कधी पडली नही , उलट माणसालाच त्याची गरज नेहमी पडत असे पण हे तेंव्हा कधी  कोणाच्या लक्षातच आले नाही.
   इथेच मारुतीचे मंदिर होते. आणि तेच समाजमन्दिर ही होते. या मदिराला आमच्या पूर्वज्यानी बनवलेल्या लांबच  लांब जुन्या कोरीव दगडांच्या मजबूत पायऱ्या होत्या. तो पिंपळ पार आणि या पायऱ्या  हे खरंतर गावाच वैभव होत. इथेच पोरांचा लपंडावा , चिंचोके, जिब्ली असे कितीतरी खेळ रंगत होते.  इथेच रंगीत संगीत बाताड़यांचा चौकी कट्टा ही होता. दिवसभराच्या कामाने शिणून आलेला कोणीही इथे येऊन चार शब्द ऐकला -बोलला म्हणजे मनाने हलका व्हायचा.  दिवसभराचा ताण निघून जायचा. संध्याकाळी पिंपळाच्या गार सावलीत शांतता वाटायची. या पराचे , पिंपळाचे त्या मंदिराचे काही अवशेष आजही असतील खरे ......! परन्तु चैत्र -वैशाखात गाळणाऱ्या पिंपळ पानासोबत त्यावेळचे ते जून हिरवे दिवस आणि मन हुरळून टाकणाऱ्या त्या आठवणी कुठल्या कुठे नाहीश्या झाल्या.

आठवणीतल्या या अश्वथाचा मी आजही ऋणी आहे.

विझलेल्या दिव्यानां उजेड शोधत आलो,
तेंव्हा तू अंधारात एकटाच सळसळत होतास. 
माझ्या तना-मानात आजही ती सळसळ भरून आहे.   
तुझ्या हजार हातांची छायाळ माया नसंपणारी होती ,
तरी आजही मी तुझीच सावली शोधत हिंडतोय.    



Thanks for Reading....!
Blogger Widget

जूना गांव

         माझा जूना गांव म्हणजे माझ्या बालिश डोळ्यांनी पहिलेलं एक सुंदर स्वप्न. जिथे दूधसागराचा अखंड धबधबा कोसळत होता तरी एक जगावेगळी शांतता होती. जिथे रानपाखरांची सदैव किलबिल होती तरी गुंजणाऱ्या वाऱ्याच एक अजरामर संगीत ऐकू येत होतं. उन, वारा, पाऊस कितीही असो देव पहाडांच रूप घेऊन तिथल्या प्रत्येक निष्पाप जीवाच्या रक्षणासाठी सदैव निष्चलपणे उभे होते. ओबड धोबड मातीच्या सारवलेल्या अंगणातही रात्र चांदणं शिंपत येत होती. आणि हरवलेल्या प्रत्येक दिवसांच्या धुंद  आठवणी  त्याच रात्रीच्या अंधारलेल्या पोटात नाहिश्या होत होत्या.
      आज मन पुन्हा त्या हरवलेल्या दिवसाना साद घालते पण प्रतिसाद मात्र येत नहीं.  निळं पाणी निळं आभाळ, हिरवेगार डोंगर आणि लाल काळी माती. सुगीला गजबलेली हिरवी पिवळी शेती. आणि त्या पलीकडे सरस्वतीने आपला निळासावळा पदर टाकावा तशी लांबच लांब वाहत गेलेली नगमोडी नदी. जिच्यावर बारा महीने प्रत्येक जिव विसंबुन रहत होता.

     या नदीने आणि तिला मिळालेल्या ओहोळांनी इथल्या धरणीला खुप कही दिलेलं  होतं, आणि धरणी मातेच्या उदरातले ते दान वर्षानु वर्षे इथल्या प्रत्येकालाच मिळत होतं. कड़क उन्हाळा असला तरी इथे रानातल्या झाड़ा -झुडुपातला गारवा कायम टिकून असायचा. इथल्या धरणीच्या पोटातलं पाणी म्हणजे अमृताची धार होती. वॉटर फ़िल्टर सारख्या तकलादु यंत्राची कधीच गरज पडली नहीं. आणि इथला पाऊस !
... .. पहिल्या पावसात सारं रान नाहून प्रफुल्लित व्हायचं. वाऱ्याच्या लहरी बरोबर लपलपणाऱ्या हिरव्या गावतावरुन मातीचा नवा गंध दरवळत रहायचा. आणि आभाळभर तहानलेल्या पाखरांची किलबिल सुरु व्हायची. मग नक्षत्रा बरोबर हळुहळू पाऊस वाढत जायचा, जुन्या राईवळीने गजबजलेल्या पहाडांच्या कोंदणात निवलेल्या झ-याना पुन्हा पाझर फुटायचे. सोसाट्याच्या वाऱ्यात आंबा फणस आणि जाम्बळांची झड़ व्हायची.  साऱ्या गाववार भर दिवसा अंधराच झाकण टाकणारा पाऊस. कधी मोत्यांचा होऊन कुणब्यांची ओटी भरून वहात राहायचा. 

पाबळ
       धबधबा : याला आम्ही पाबळ म्हणत असे. हे पाबळाच राण म्हणजे जुन्या पुरान्या झाड़ा झुडपानी गजबजलेल दाट बन होतं. इथे दिवसाहि किर्र शांतता असायची. संध्याकाळी इथे एक -दोघेही एकटे जाण्याच कोणाच धौर्य होत नसे. थोडसं भयावह पण आजही तितकच ओढ लावणार हे राण. या पाबळा मुळे धबधब्याची एक अशीच कल्पना होऊन बसली. ती म्हणजे कोणताही धबधबा असेल तर तो असाच अगड़बम कोसळणारा पाण्याचा प्रपात असतो.  त्यानंतर कितीतरी ऊंच धबधबे पाहिले पण पाबळाची सर मात्र एकातही दिसली नाही.
मुसळधार पावसात या पाबळावरून गढूळ पाण्याचा मोठ्ठा प्रपात खालच्या खोल दरीत कोसळत , तेंव्हा त्याचा आवाज म्हणजे हजार वाघांची एकच गर्जना साऱ्या रानभर घुमत. आणि अंधारात बुडालेल्या गावावरुन त्याची ही गर्जना रात्रभर घोंगावत असे. 
पार  आणि मरुतीचे मंदिर 

ज्या मातीच्या कुशीत चिमूकल्या पावलांच बालपण हरवलं, ज्या झाडांच्या अंगाखांद्यांवरुन अल्लड वय निघून गेलं.  आणि आभाळात गेलेल्या  डोंगर वटांवरुन वेड्या साहसांचे खेळ खेळून झाले त्या साऱ्यानाच आज सांगावेसे वाटते ,
किस्मत से हम न थे जुड़े , जहा हवा फैलाती गई जीवन की नौका वहाँ चली आयी और बदनसीब है हम वही खड़े 

              

  

क्रमशः ......!

Blogger Widget

काव्यांजन

   //  प्रस्ताविक  //

  असच एका संध्याकाळी का कोणास ठाऊक  पण व्रतस्त झालेलं आभाळ काहीसं उदास झालं. आणि ध्यानस्त असलेल्या पहाडांच्या सावल्या अंधाराच्या अनामिक ओढीनं सरपटत येऊन माझ्या अवतरणात अलगद विलीन झाल्या.  मग मी माझं सावली नसलेलं अस्तित्व घेऊन हिंडू लागलो. काही वेळाने सांज सरीतून रक्तचिंब झालेलं लाल ओलं केशर झरझऱुण सांडू लागलं , मावळतीच्या गर्भ रेशिम दिशेला संधिप्रकाशची ओढ़ लागलेले पक्षी थव्या - थव्यानी  झेपावले.    आणि अंग हुळहुळनारा वारा मातीच्या उबदार कुशीत जीवघेण्या आनंदाने लोळू लागला.
  स्तब्ध रानात दूरवर एक सळसळ उठली आणि  वात भव-याच्या  मध्यबिंदुतुन उठलेलं रूद्र वावटळ धुळीचे
लोळ च्या लोळ त्या उदास निर्विकार आकाशावर त्वेषाने फेकू लागलं. व  मागू लागलं त्याच्या सवालीच आंदण   मग उशीरन दिशा -दिशा पांघरून घनगर्द काळोख आला. आणि गहिवरलेल्या अंतराळात एका हरवलेल्या एकट
दिवसाची धीरगंभीर विराणी घुमू लागली. तिच्या फाटक्या जड सुरांनी गजबजलेलं मन सैरभैर होऊन गर्द काळोखाचा अथांग डोह पिंजत राहिलं. किती तरी वेळ - किती तरी वेळ निघून गेला. आणि मग एका अदभूत कासायावेळी दिगंताच्या सुदूर वाटेवरून प्रकाश्याचे दूत त्या शब्दांची पालखी अनाहूतपणे घेऊन आले. तिच ही काव्यधारा म्हणजे सरस्वतीने दिलेली एक सुगंधीत फुलांची ओंजळ. तशी ती अजून अल्लड आहे. पण म्हणून मी काही तिच्यासाठी -हृदयाच्या पायघडया अंथरलेल्या नाहीत. कारण तिला देखिल या मातीची ओढ अगाध आहे. 

Blogger Widget

The Revenant

     'अलेजांद्रो इनारितू' हा एक मॅक्सिकन दिग्दर्शक , प्रोडूसर आणि पटकथा लेखक आहे. याचा जन्म ऑगस्ट १९६३ साली मेक्सिको शहरात झाला. त्याच्या किशोर वयात त्याने यूरोप -अफ्रीका या दरम्यान अटलान्टिक महासागरावरून चलणाऱ्या व्यापारी मालवाहु जहाजावर काही काळ नोकरी केली.  नंतर १९८४ मध्ये  त्याने मैक्सिको रेडिओ स्टेशनला एक रेडीओ होस्ट म्हणून आपल्या करिअरला सुरवात केली. इथूनच त्याच कथालेखन चालु झाल. नंतर त्याने स्वताच एक छोटी 'झेड फिल्म्स ' नावाची प्रोडक्शन कंपनी चालू केली आणि  काही शॉर्ट फिल्म्स बनवायला सुरुवात केली.  सन २००० साली त्याचा 'अमोरेस पेरोस ' हा  मेक्सिकन समाज जीवनावर आधारीत पहिला सिनेमा प्रदर्शित झाला. ज्याला कान फिल्म फेस्टिवल मध्ये सिटीज़ वीक ग्रँड प्राइस मिळाले. आणि best foreign language  म्हणून Academy Award ही जाहीर झालं. या यशा नंतर त्याने '२१ ग्राम्स (२००३)', 'बेबल (२००६)', ब्यूटीफुल (२०१०), बार्ड मैन (२०१४), आणि 'दि रेवेनंट (२०१५)' आशा कही दर्जेदार चित्रपटांची निर्मिति केली.

       त्या पैकी  'दि रेवेनंट' या चित्रपटाला एकूण १२ नामांकने मिळाली. बेस्ट पिक्चर , बेस्ट डिरेक्टर , बेस्ट एेक्टर , बेस्ट सिनेमाटोग्राफी , आणि बेस्ट विजुअलायझेशन सह २०१५ सालचा हा सर्वोत्कृष्ट ऑस्कर सिनेमा ठरला.

    'दी रेवेनंट' हा सिनेमा एका अमेरिकन लेखक 'माइकल फूंके' याच्या त्याच नावाने २००२ साली प्रकाशित झालेल्या एका प्रसिध्द कदंबरीवर आधारित आहे. ही कादंबरी सन सतराशे  ते आठराशेच्या काळात नॉर्थ अमेरिकेच्या जंगलात  घडलेल्या एका सत्य घटनेवार आधारित आहे. 'ह्यु ग्लास' नावाचा एक शिपाही त्यावेळच्या घनदाट जंगलातून प्राण्यांची शिकार करुन त्यांच्या दात आणि कातडीचा व्यापार करत असे. तो हा 'ह्यु ग्लास' व त्याचे काही साथीदार यांच्या जीवनात घडलेला थरार ही कादंबरी विस्तारणे सांगते. परंतु या कदंबरीच्या ही फार पूर्वी म्हणजे १९७१ मध्ये 'ह्यु ग्लास' च्या या जंगलातील आयुष्यावर एक चित्रपट निघाला होता तो म्हणजे 'मँन इन दि वाइल्डरनेस' त्याचे दिग्दर्शन 'रिचार्ड सराफेन' या दिग्दर्शकाने केले होते.

      दिग्दर्शक इनारितुची चित्रपट सदारीकरणाची शैली खुप वेगळी आहे. त्याचा चित्रपट सुरु होण्याधीच अंधरलेल्या पार्श्वभूमीवरून पुढे घडणाऱ्या एका थरार नाट्याचा एक वेगळाच आवाज एकू येऊ लागतो.  व तो हळूहळू वाढत जाऊन क्षणार्धात प्रेक्षकांचे लक्ष्य वेधून घेतो. 'दि रेवेनंटची ' सुरुवात ही अशीच आहे. पडद्यावर काही दिसण्याधीच रानातून श्वास घेत घोंगावना-या वाऱ्याचा भयावह आवाज एकु येऊ लगतो. आणि हळुहळू एक जळून उध्वस्त झालेली राहुटी व त्यात यातना व्याकुळ झालेलं कुटुंब दिसतं. हे एक कधीकळी उध्वस्त झालेल्या नायकाच्या आयुष्याचं दिवास्वप्न असतं. त्यानंतर दिसतं ते जंगलातील आभाळाला भिडणाऱ्या ऊंच झाडांच्या मधून संथ गतीने वहानारे पाणी व नंतर त्या पाण्यातून सावकाश पाय ओढत चाललेला बंदूकधारी शिकारी 'ग्लास ' व त्याचा साथीदार. पुढे येणाऱ्या सावजाला पाण्याचा आवाजाही जाणार नाही आशा बेताने दोघेही पुढे होऊन 'ग्लास' एका सावजावर आपला निशाना साधतो, एक भलं मोठं जनावर निर्जीव होऊन पडतं. मग त्या जंगलात आलेले ग्लासाचे सगळे साथीदार शिकार झालेल्या सगळ्या जनवारांची कातडी सोडवताना दिसतात. वाढलेले केस आणि दाढ़ी, सा-यांचेच ओरभाडलेले चहरे , कोणी सामनाची व्यावस्था लावतो आहे. कोणी एक मेकाशी वादविवाद घालतो आहे. आणि एवढ्यात आरिकारा या रानटी लोकांचा हल्ला होतो. (अरिकारा ही एक अमेरिकन आदिवासी जमात होती. )   आणि मग सुरु होतो रानटी आक्रमणाचा एक संवेदनहीन खेळ.

जिवन मृत्युशी संघर्ष करणाऱ्या
लढवय्याची कहानी
प्रत्येकानेच पहायला हवी.

कला आस्वाद भाग -२ 

..... क्रमश:


   
Blogger Widget