The Revenant

     'अलेजांद्रो इनारितू' हा एक मॅक्सिकन दिग्दर्शक , प्रोडूसर आणि पटकथा लेखक आहे. याचा जन्म ऑगस्ट १९६३ साली मेक्सिको शहरात झाला. त्याच्या किशोर वयात त्याने यूरोप -अफ्रीका या दरम्यान अटलान्टिक महासागरावरून चलणाऱ्या व्यापारी मालवाहु जहाजावर काही काळ नोकरी केली.  नंतर १९८४ मध्ये  त्याने मैक्सिको रेडिओ स्टेशनला एक रेडीओ होस्ट म्हणून आपल्या करिअरला सुरवात केली. इथूनच त्याच कथालेखन चालु झाल. नंतर त्याने स्वताच एक छोटी 'झेड फिल्म्स ' नावाची प्रोडक्शन कंपनी चालू केली आणि  काही शॉर्ट फिल्म्स बनवायला सुरुवात केली.  सन २००० साली त्याचा 'अमोरेस पेरोस ' हा  मेक्सिकन समाज जीवनावर आधारीत पहिला सिनेमा प्रदर्शित झाला. ज्याला कान फिल्म फेस्टिवल मध्ये सिटीज़ वीक ग्रँड प्राइस मिळाले. आणि best foreign language  म्हणून Academy Award ही जाहीर झालं. या यशा नंतर त्याने '२१ ग्राम्स (२००३)', 'बेबल (२००६)', ब्यूटीफुल (२०१०), बार्ड मैन (२०१४), आणि 'दि रेवेनंट (२०१५)' आशा कही दर्जेदार चित्रपटांची निर्मिति केली.

       त्या पैकी  'दि रेवेनंट' या चित्रपटाला एकूण १२ नामांकने मिळाली. बेस्ट पिक्चर , बेस्ट डिरेक्टर , बेस्ट एेक्टर , बेस्ट सिनेमाटोग्राफी , आणि बेस्ट विजुअलायझेशन सह २०१५ सालचा हा सर्वोत्कृष्ट ऑस्कर सिनेमा ठरला.

    'दी रेवेनंट' हा सिनेमा एका अमेरिकन लेखक 'माइकल फूंके' याच्या त्याच नावाने २००२ साली प्रकाशित झालेल्या एका प्रसिध्द कदंबरीवर आधारित आहे. ही कादंबरी सन सतराशे  ते आठराशेच्या काळात नॉर्थ अमेरिकेच्या जंगलात  घडलेल्या एका सत्य घटनेवार आधारित आहे. 'ह्यु ग्लास' नावाचा एक शिपाही त्यावेळच्या घनदाट जंगलातून प्राण्यांची शिकार करुन त्यांच्या दात आणि कातडीचा व्यापार करत असे. तो हा 'ह्यु ग्लास' व त्याचे काही साथीदार यांच्या जीवनात घडलेला थरार ही कादंबरी विस्तारणे सांगते. परंतु या कदंबरीच्या ही फार पूर्वी म्हणजे १९७१ मध्ये 'ह्यु ग्लास' च्या या जंगलातील आयुष्यावर एक चित्रपट निघाला होता तो म्हणजे 'मँन इन दि वाइल्डरनेस' त्याचे दिग्दर्शन 'रिचार्ड सराफेन' या दिग्दर्शकाने केले होते.

      दिग्दर्शक इनारितुची चित्रपट सदारीकरणाची शैली खुप वेगळी आहे. त्याचा चित्रपट सुरु होण्याधीच अंधरलेल्या पार्श्वभूमीवरून पुढे घडणाऱ्या एका थरार नाट्याचा एक वेगळाच आवाज एकू येऊ लागतो.  व तो हळूहळू वाढत जाऊन क्षणार्धात प्रेक्षकांचे लक्ष्य वेधून घेतो. 'दि रेवेनंटची ' सुरुवात ही अशीच आहे. पडद्यावर काही दिसण्याधीच रानातून श्वास घेत घोंगावना-या वाऱ्याचा भयावह आवाज एकु येऊ लगतो. आणि हळुहळू एक जळून उध्वस्त झालेली राहुटी व त्यात यातना व्याकुळ झालेलं कुटुंब दिसतं. हे एक कधीकळी उध्वस्त झालेल्या नायकाच्या आयुष्याचं दिवास्वप्न असतं. त्यानंतर दिसतं ते जंगलातील आभाळाला भिडणाऱ्या ऊंच झाडांच्या मधून संथ गतीने वहानारे पाणी व नंतर त्या पाण्यातून सावकाश पाय ओढत चाललेला बंदूकधारी शिकारी 'ग्लास ' व त्याचा साथीदार. पुढे येणाऱ्या सावजाला पाण्याचा आवाजाही जाणार नाही आशा बेताने दोघेही पुढे होऊन 'ग्लास' एका सावजावर आपला निशाना साधतो, एक भलं मोठं जनावर निर्जीव होऊन पडतं. मग त्या जंगलात आलेले ग्लासाचे सगळे साथीदार शिकार झालेल्या सगळ्या जनवारांची कातडी सोडवताना दिसतात. वाढलेले केस आणि दाढ़ी, सा-यांचेच ओरभाडलेले चहरे , कोणी सामनाची व्यावस्था लावतो आहे. कोणी एक मेकाशी वादविवाद घालतो आहे. आणि एवढ्यात आरिकारा या रानटी लोकांचा हल्ला होतो. (अरिकारा ही एक अमेरिकन आदिवासी जमात होती. )   आणि मग सुरु होतो रानटी आक्रमणाचा एक संवेदनहीन खेळ.

जिवन मृत्युशी संघर्ष करणाऱ्या
लढवय्याची कहानी
प्रत्येकानेच पहायला हवी.

कला आस्वाद भाग -२ 

..... क्रमश:


   
Blogger Widget

बालम की गलीमें। ....!

हां .. ये रस्मेंss  ये कसमें सभी तोड के,
तू चली आ चुनर प्यारकी ओढ़के।
या चला ...जाऊंगा.... मैं ये जग छोडके।

   सात्विक प्रेमाने भरलेल्या -हृद्याच्या एका खोल खोल तळापासून आलेली ही हाक. संवेदनशील मनाला भावव्याकुळ केल्याशिवाय राहत नाही . हे शब्द आहेत आनंद बक्षी यांचे ज्यानी बॉलीवुडच्या दुनियेला पुराणी यादें म्हणून तीन हजाराहुन अधिक गाणी दिली.  आणि दर्दभरा स्वर ज्याच्या प्रवाहात ऐकणारा प्रत्येकजण पूर्णपणे नाहून निघेल. तो म्हणजे मुकेश यांचा. (चित्रपट - कटिपतंग )       


 जिस जगा याद तेरी सताने लगे,
उस जगा एक पल भी ठेहराना नहीं।

जिस गलीमें तेरा घर ना हो बालमां ,
उस गलीसे हमें तो गुजरना नहीं।

  आजही बहुतेकानां वाटतं की खरच ते जुने दिवस किती सुंदर होते. पण आज ते राहील नाही . आणि माणसा -माणसातील ते सात्विक प्रेमही उरल नहीं. कोणास ठाऊक तसं झालही असेल. पण खऱ्या प्रेमाची त्या वेड लावणाऱ्या क्षणांची आणि क्षणा क्षणाला आठवण करुण देणाऱ्या खऱ्या प्रेमाची एक अस्सल अनुभूती या शब्दातच नाहीं का? त्या चोरुन भेटण्याच्या जागा, रणफूले, नदी किनारे, झाडाझुडुपांचे अाड़ोसे, आणि रात्रीचा चंद्र कोरुन येणारे निखळ चांदणे. आपल्या नकळत हे किती तरी आपल्या प्रेमाचे साक्षीदार असतात. व म्हणूनच त्या ठिकाणी आपण परत एकटेच गेलो तर एक क्षणभर देखिल थाबनं  किती मुश्कील होऊन जातं.
 या गाण्याचं पहीलं कडवं जे मला अतिशय आवडतं.

जिंदगी में कई रंग रलियां सहीं,
हर तरफ मुस्कुराती ये कलियाँ सहीं,
खूब-सू-रत बहारों की गलिया सहीं।

जिस चमनमे तेरे पगमे काटें चुबें ,
उस चमनसे हमें फूल चुनना नहीं।
जिस गलीमें............... !

 आ..हां। ... फुलांची फूलबाग असो वा सोन्याची सुवर्णनगरी, जिथे माझ्या प्रियेला किंचीतही दुःख पोहचेल अशी वाटच मला चलायची नाही. या पहिल्या कडव्यातच आनंद बक्षी यांना दाद दिल्याशिवाय रहावत नाही. या अप्रतिम निर्मितीत आणखी एक सिंहाचा वाटा म्हणजे आर. डी. बर्मन यांचा.  अतिशय अफलातून असं संगीत त्यांनी दिलं आहे. गाण्याचं प्रत्येक कडवं संपताच एक बासरी वाजते. काळजाला स्पर्श करुण जाणारी. फार व्याकुळ होतं मन तेंव्हा। .!




       
Blogger Widget

ब्लॉग बद्दल थोडीशी प्रस्तावना

    नमस्कार मित्रांनो , आस्वाद ही एक मराठी वाचक ,साहित्य,संगीत आणि चित्रपट प्रेमींसाठी नवी लेखनमालिकाआहे, सर्वांनाच ही नक्की आवडेल अशी अपेक्षा करतो. त्याचबरोबर फ्री बुक्स मध्ये विनामूल्य पुस्तके व फ्री इमेजेस मध्ये तुमच्या भाषेतील शुभेछ्या व आभार देण्यासाठी अनेक कार्ड्स ही येथे उपलब्ध आहेत. त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता व आपल्या मित्रांना ही शेर करू शकता. हा ब्लॉग आवडल्यस आपल्या ईमेल आयडी सह नक्की सब्सक्रइब करा त्यामुळे ब्लॉगवर अपडेट होणारे नव नविन लेखन तुम्हाला माहीत होईल. 

[सूचना : या डिजिटल मराठी लेखना मध्ये चुकून काही किरकोळ चूका आढळल्यास  आम्ही आपले  सदैव क्षमस्व राहीन . ] 

   लहान असताना तुम्ही कधी गर्द गाभुळलेलि चिंच खाल्लेय काय? आता  या प्रश्नावर काहींच्या प्रतिक्रया असतील : काय बालिश प्रश्न विच्यारतो हा ! तसही आहे खरं. पण खाल्ली असेल तर आठवून पहा. ती चिंच तोंडात टाकण्या आधीच तोंडाला सुटणारं पाणी आणि खाल्यावर  आम्बट गोड चवीने शिवशिवनारे दात. या नंतर काही दातांच्या दुखण्याने खाने टाळतात परंतू काहीजण त्याचीही फिकिर न करता खात राहतात.  कारण त्यांना खाण्याचा तो अतिवा आनंद, आस्वाद हवाच असतो.
  एक जापानी दिग्दर्शक आहे 'अकिरा कुरोसावा' याने 'राशोमोन ', 'सेवन सामुराई ', 'दर्सू  उजाला ' यासारखे काही जगप्रसिद्ध चित्रपट बनवले. तो म्हणतो 'I like Extrim'. आता Extrim म्हणजे नेमके काय आणि किती ?
तर पाऊस असेल तर तो मुसळधार असावा , वादळ असेल तर ते भवन्डर असे धुळीचे लोळ उठवणारे असावे.
आग म्हणजे वणवा आणि पाणी म्हणजे समुद्राच्या बेफाम लाटा असाव्यात.
  कोणत्याही गोष्टीचा आस्वाद घेताना मलाही तसच वाटतं.  त्या गोष्टीच्या अगदी खोल तळाशी जावं , आणि  आपल्या जिद्न्यासु मनाने त्याची सम्पूर्ण तीव्रता जाणून घ्यावी. म्हणजे पिकलेला आंबा किंव्हा ऊस खायचा असेल तर त्याचे सर्व सार गोड रसासहित शोषून घ्यावे.  वाचताना प्रत्येक शब्द हातात घेऊन त्याच्या भव्य सौंदर्यानिशी निरखूं पाहवा.  एखादं आवडतं गाणं असेल तर त्याच्या शब्द -सुरांच्या प्रवाहात वहावत जावं , त्याच्या वेगवेगळ्या अर्थांच्या पैलूंचा रंगीत प्रकाश सम्पूर्ण आपल्या अंगभर पसरावा. आणि मग पिकासोच्या चित्रातल्या त्या 'Colorfull Man' सारखं रंगीत व्हावं. किंव्हा जीएंच्या कथेतील एखाद्या पात्रासारखं  बेधुंद होऊन जगावं. त्या रंगीत प्रकाश्याच्या समुद्राला भारती यावी आणि बेफाम उसळणाऱ्या लाटांची पर्वा न करता केवळ आस्वादाच्या ओढीने चालत रहावं. खुप चालत रहावं अगदी स्वप्नांच्या पलीकडे.





✎.... एस. व्ही गोडसे. 
Blogger Widget